आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महिला सुरक्षेबाबतच्या कायद्याची नीटपणे अंमलबजावणी करीत नसल्याची तक्रार जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्याची मागणीही केली . राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणी दरम्यान पवार यांनी सौ. चाकणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
जालना जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून महिलावरील अन्याय- अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत.अनेक महिला ह्या दिवसाढवळ्या गायब होत आहेत ,महिला व युवतींचे विनयभंग हे राजरोसपणे होत आहेत.सन २०२२ मध्ये जालना जिल्ह्यात बलात्काराच्या ९४ घटना घडल्या आहेत. हुंड्यासाठी ५०३ विवाहित महिलांच्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना घडल्या आहेत. ७२ तरूणी व महिलांचे अपहरण झाले आहे. तर ४०० महिलांचे विनयभंग झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत असून आंधळेपणाचे सोंग घेत आहे. असे म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.