आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना जीडीसी कॉइनमध्ये जालनेकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. २०१६ पासून हा गैरकारभार चालू आहे. या सर्व फसवणुकीमागील म्होरक्या इरफान हा दहावी नापास असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वेबसाइट तयार करून खात्यावर रक्कम मागवून घेत नंतर तो जीडीसी (global digital cluster) काॅइन देत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
जालना जिल्ह्यात प्रमोटर असलेल्या किरण खरात व त्यांची पत्नी यांनी जीडीसी कॉइनमध्ये पैसे गुंतवणूक करून तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या ११ टक्के दरमहा मिळून कॉइन लाँच झाल्यानंतर त्याची भारतीय रुपयाच्या तुलनेत अनेक पटीने परतावा मिळवून देतो, असे आमिष देऊन जालना जिल्ह्यात ११६ जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, तपासात मुख्य म्होरक्या हा दहावी नापास असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी पुणे, इचलकरंजी येथे जाऊन चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून महागडे वाहनेही ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक बी. डी. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर पायघन, संभाजी वडते, फुलासिंग गुसिंगे, मंगला लोणकर, अंमलदार श्रीकुमार आडेप, ज्ञानेश्वर खराडे, सागर बाविस्कर आदींनी केली.
वेबसाइटवरूनच कॉइनचे दर खाली-वर बनावट वेबसाइट तयार करून तो कॉइन तयार करून त्याचा दर कमी-जास्त करण्यासाठी त्याच्याच वेबसाइटवरून हाताळणी केली जायची. दर कधी खूप वाढायचा. यात अनेकांना चांगला मोबदला मिळायचा. परंतु, थोडा खाली आल्यानंतर कमी मोबदला मिळत होता. यातून अनेकांची फसवणूक झाली आहे.
आरोपी वाढतील कोल्हापूर, पुणे येथून काही संशयित आरोपी महागड्या वाहनांसह ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करणार आहे. - ज्ञानेश्वर पायघन, सहायक पोलिस निरीक्षक, जालना
वाहनांचे दाखवले अनेकांना आमिष जीडीसी कॉइनमध्ये व्यवहार वाढवण्यासाठी व हा कॉइन जास्तीत जास्त जणांनी खरेदी करण्यासाठी आमिष म्हणून प्रमोटर असलेल्यांना महागडी ६० लाख ते १ कोटींपर्यंतची वाहने देण्यात आली आहे. या आमिषातून जालन्यातून अनेकांनी हे कॉइन घेऊन गुंतवणूक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.