आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:थकीत पाणीपट्टी असणाऱ्या‎ ग्रामपंचायतींची यादी जाहीर‎‎

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी थकीत‎ बिगर सिंचन पाणीपट्टी भरणा‎ करण्याचे आवाहन पाटबंधारे‎ विभागाचे कार्यकारी अभियंता‎ एस.बी. कोरके यांनी केले आहे.‎ जालना पाटबंधारे विभाग‎ अधिनस्त पाटबंधारे उप विभाग क्र-१‎ जालना, उपविभाग क्र.२ अंबड,‎ उपविभाग -३ टेंभुर्णी, उपविभाग‎ क्र.४ वाटुर, उपविभाग क्र.२ सेलू या‎ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील‎ प्रकल्पनिहाय बिगर सिंचन ग्राहक‎ नगर पालिका, नगर पंचायत, साखर‎ कारखाने, सामाजिक प्रतिष्ठाणे‎ आदींकडे ग्रामपंचायत पिण्याच्या‎ पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.‎

सदर योजनेकडे बिगर सिंचन‎ पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात‎ थकबाकी आहे, त्यामुळे थकबाकी‎ वसुलीसाठी अधीक्षक अभियंता व‎ प्रशासक लाभक्षेत्र विकास‎ प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडून‎ २०२२-२३ साठी १०० टक्के वसुलीचे‎ उद्दिष्ट विभागीय कार्यालयास प्राप्त‎ आहे. त्याप्रमाणे विभागीय‎ कार्यालयाकडून ३० जानेवारी ते २१‎ फेब्रुवारी २०२३ रोजी धडक मोहिम‎ राबवून सर्व उपविभागाकडून‎ जिल्ह्यात एकाच वेळी प्रकल्पातून‎ पिण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या‎ योजनेचे पाणी पुरवठासह विद्युत‎ पुरवठा अंशत: खंडीत करण्यात‎ आला होता. त्यामुळे काही प्रमाणात‎ वसुली झाली परंतु प्राधिकरण‎ कार्यालयाकडून १०० टक्के थकीत‎ पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट असल्याने‎ प्रकल्पातून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून‎ बिगर सिंचन पिण्याच्या पाण्याचा‎ उपसा करणाऱ्या बिगर सिंचन योजना‎ धारकांचा पाणी पुरवठासह विद्युत‎ पुरवठा १६ मार्चपासून खंडीत‎ करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...