आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:ज्यांनी कंठात नामरूपी कृष्णमणी धारण केला त्यांचे जीवन प्रकाशमान‎

आन्वा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी आपल्या कंठा मध्ये कृष्ण नाम‎ रूपी मणी धारण केला त्यांचे जीवन‎ प्रकाशमान होऊन त्यांचा प्रकाश अवघ्या‎ जगात पडला. त्यामुळे मनुष्याने‎ जीवनात कोणतेही नाम कंठात घ्यावे,‎ आपली चित्त शुद्धी झाल्याशिवाय‎ राहणार नाही, असा उपदेश गुरुवर्य श्री‎ माउ ली महाराज चातुर्मास्ये यांनी केला.‎ श्रीक्षेत्र अन्वा येथे सुरू असलेल्या‎ माघी उत्सवाची सांगता संत सद्गुरु‎ विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये श्री‎ रुक्मिणी पांडुरंग संस्थानचे पंधरावे‎ विद्यमान अधिपती गुरुवर्य ज्ञानेश्वर‎ माउली चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या‎ कीर्तनाने शुक्रवारी दि.३ झाली.

यावेळी‎ महाराजांनी //" कंठी धरीला कृष्णमणी‎ अवघा जनी प्रकाश काला वाटू,‎ एकमेका वैष्णव निका संभ्रम//" या‎ जगदगुरू संत तुकोबारायांच्या अभंगाचे‎ काल्याच्या कीर्तनसेवेत सुंदर निरुपण‎ केले. गुरुवर्य माउली महाराज पुढे‎ म्हणाले की, वैकुंठामधील देवादिकांना‎ दुर्लभ असणारा काला प्रसाद सद्गुरु‎ संत कृपेने प्राप्त होतो. श्रीकृष्ण‎ चरित्रातील ‘गोपाळकाला'' हा‎ श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतार‎ कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. काल्यातील‎ प्रमुख घटक पोहे, दही, दूध,अभंगावर‎ ताक व लोणी हे हे प्रमुख घटक त्या-त्या‎ स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.‎

पोहे वस्तुनिष्ठ गोप भक्तीचे प्रतीक, दही‎ वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा‎ करणाऱ्या मातृ भक्तीचे प्रतीक दूध हे‎ गोपींच्या सहज सगुण मधुरा भक्तीचे‎ प्रतिक अाहे. गोपींच्या विरोध भक्तीचे‎ प्रतीक लोणी हे सर्वांच्या श्रीकृष्णावरील‎ अवीट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक‎ आहे. या दिवशी ब्रह्मांडात कृष्ण‎ तत्त्वाच्या आपत्त्वात्मक प्रवाही गतिमान‎ लहरींचे आगमन होते.‎ काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण‎ करण्यात अग्रेसर असतात असे‎ सांगितले. यावेळी कैवल्य महाराज‎ महाराज चातुर्मास्ये, परमेश्वर महाराज‎ गाेंडखेडकर,राधेश्याम महाराज‎ चातुर्मास्ये, राज महाराज चातुर्मास्ये,‎ संदीप महाराज वाडेकर यांच्यासह‎ पंचक्रोशीतील गुरूभक्त माेठ्या संख्येने‎ उपस्थित होते. यावेळी दहीहंडी फोडून‎ उपस्थित भाविकांना काल्याचा प्रसाद‎ देण्यात आला.‎

जड अंत:करणाने गुरूभक्तांनी‎ घेतला अन्व्याचा निराेप‎ संत सद्गुरु विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये‎ श्री रुख्मिणी पांडुरंग संस्थानच्या वतीने माघी‎ उत्सवानिमित्त मंगळवार दि.३१ जानेवारी ते‎ शुक्रवार ३ फेब्रुवारी दरम्यान रोज गुरुवर्यांचे‎ कीर्तन, पांडुरंगाची रथातून मिरवणुक,‎ नगरप्रदक्षिणा, हरिजागर, महाप्रसाद, रक्तदान‎ शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात‎ आले होते. यावेळी मराठवाडा,खान्देश,‎ विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून चार‎ दिवस गुरू भक्त मोठ्या संख्येने अन्वा येथे‎ दाखल झाले होते. शुक्रवारी माऊली‎ महाराजांच्या हस्ते काल्याचा प्रसाद घेऊन‎ गुरू भक्तांनी जड अंत:करणाने अन्व्याचा‎ निरोप घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...