आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण:दोन दिवसांत चार अंशांनी वाढला पारा; आजही राहणार ढगाळ वातावरण

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेतील अतिशीत वाऱ्याने तीन दिवसांपूर्वी यंदाच्या हिवाळ्यातील निच्चांकी १४ अंश सेल्सियस अशी नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मात्र तीन दिवसातच तापमानात ४ अंशाची वाढ झाली आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मॅन डौस चक्रीवादळाचा जिल्ह्यात धोका नाही मात्र त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन त्यामुळे गारठा कमी झाला आहे. मंगळवारीही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी बरसण्याची शक्यता आहे.

हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. परिणामी तापमानातही कमालीचे चढउतार जाणवत आहे. त्यामुळेच ९ डिसेंबर रोजी किमान तापमानात १७ अंंशावर होते तर १० डिसेंबर रोजी ते ३ अंशानी घसरून १४ अंशावर आले. त्यातच सोमवारी तब्बल ४ अंशाची वाढ झाली. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे.

तुरीवर परिणाम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तापमानात चढ-उतार जाणवतो आहे. ज्या तुरी आता फुलोऱ्यात आहे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बुरशीनाशकाची एक फवारणी करणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवस तापमानात बदल जाणवेल. हलक्या सरी कोसळू शकतात.
- डाॕॅ.पंडित वासरे, कृषी हवामान शास्त्रज्ञ, के.व्ही.के., खरपुडी

बातम्या आणखी आहेत...