आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी परीक्षेत जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
जाफराबाद येथील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निर्मला दानवे, आ.संतोष पा.दानवे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुरेश दिवटे, बी.के.जाधव, मुख्याध्यापक एन. टी, दिवटे, शालिनी बकाल, प्राचार्य विलास नवले, भगवान कोल्हे, सुनिल पाटील, श्रीकृष्ण वानखेडे, प्रशांत अंभोरे, रमेश उखर्डे, गजानन वायाळ, अनंता कळंबे, शहादेव ईलग, भरत शेळके, दिपाली बन्सवाल, मंजुषा आत्राम, ललिता रोडगे, सुनिता भोसले, गणेश बकाल संतोष शिंदे, संजय जोशी, दिलीप माळी आदींनी अभिनंदन केले. शाहू महाराज विद्यालय
जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे, लताताई गरबडे, मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे, एस. आर. कुलकर्णी. वाय. बी. मदन, डी. एन. सोनकांबळे, पी. पी. नागरे, एस. बी. देशपांडे, एल. बी. जाधव, आर. एस. ठाकरे, एस. बी. राऊत, एम. ए. खरात यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदींची उपस्थिती होती. श्री गणपती स्कूल
भोकरदन येथील श्री गणपती इंग्लिश हायस्कूल व ज्यु. कॉलेज आणि श्री गणपती मराठी हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटनेते संतोष अन्नदाते, प्राचार्य जी. आर. सपकाळे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, जी. व्ही. जाधव, गजानन बुलगे, काकासाहेब ढवळे, स्वप्निल जाधव, मनोहर जाधव, रोषण देशमुख आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.