आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त:रोगराईने ग्रस्त मोकाट कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक वार्डात २० ते २५ कुत्रे रोगराईने त्रस्त असून मोकाट फिरत आहेत. मोटार सायकल वर जाणारे, पाई फिरणारे, सकाळी सकाळी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी गल्ली बोळात दुकानांवर जाणारे लहान मुले व मुली यांच्यावर ही कुत्रे हल्ला करीत आहेत. या कुत्र्यांचा नगर पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सदगुरे यांनी केली आहे.

नगर पालिकेत दिलेल्या निवेदनात म्हटले, जालना शहराच्या सीमावर्ती भागात दुसऱ्या गावातील लोक १०० ते १५० कुबी सोडून जात असल्याचे ही पहावयास मिळत आहे. सदरील कुत्री ही रागराई ग्रस्त असून झुंडीने जालना शहरात फिरतात. फुले मार्केट, अलंकार टॉकिज, गवली पुरा, खडकपुरा, कबाड़ी महोल्ला, पोलास गल्ली, बरबार गल्ली, रहेमान गंज, देऊळगांवराजा रोड, सिंधी मंदिर, उतार गल्ली, दर्गाबेस, रामनगर, पोलिस कॉलनी, बागवान गल्ली आदी ठिकाणी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सदगुरे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...