आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शेतीच्या कृषिपंपांची वीज कट करण्याच्या शासन व महावितरण कंपनीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असे इशारा माजी आ.चंद्रकांत दानवे यांनी दिला आहे.
भोकरदन तालुक्यातील कृषिपंपांची वीज खंडित करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीने सुरु केली होती. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरण कंपनीच्या उपविभागिय कार्यालयावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व गावरान तसेच गावठाण हद्दीतील बांधकाम पाडण्यासाठी प्रशासनाद्वारे नोटीस देण्यात आलेल्या असून यावेळी अतिक्रमण बाधीत घरांचे सरंक्षण देण्यात यावे यासाठी देखील अतिक्रमण बाधीत गरीब कुटुंब देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान शेतकन्यांच्या सन्मानात राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, पन्नास खोके... एकदम ओके, शेतीचे वीज बिल माफ झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दुमदमुन गेला होता. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय भोकरदन येथुन पायी चालत जात मोर्चेकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरषांना अभिवादन करत महावितरण कार्यालयावर धडकले.
यावेळी मा.आ. चंद्रकांत दानवे, युवानेते सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष रमेशशेठ सपकाळ, युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश जाधव, मा. नगरसेवक शब्बीर कुरेशी, जिल्हासरचिटणीस संग्रामराजे देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष अशोकराव पवार, पी. पी. पवार आदिनी मोर्चास संबोधीत केले. यावेळी मोर्चामध्ये शंकर भुते, शहराध्यक्ष नईम कादरी, नगरसेवक अब्दुल कदीर बापू, अजहर शहा, नसीम भाई पठाण, शमीमभाई मिर्झा, जुमान चाऊस, प्रल्हाद पा. गोरे, रामदास रोडे, तान्हाजी पा. गावंडे, दिपक देवकर, भूषण लव्हाळे, प्रभाकर लुटे, अरशद पठाण, किसनराव खडके, भगवानशेठ गायकवाड, राधाकिसन भोसले, कडुबा तात्या देशमुख, सारंगधर भोंबे, उत्तमराव भोंबे, वर्धमान शेठ वास्कर, नाना पा. तांगडे, रामशेठ बावस्कर, उखाजी पा. कोरडे, राजु पा. गोरे, डी. डी. गोरे, मंजितराव पांडव, जयराम मुट्ठे, अनिलशेठ संभेराव, दिलीप बावस्कर, सारंगधर जामुंदे, डॉ. जनार्धन जाधव, वामनराव जंजाळ, बळीराम ठाले, पंडीतराव आगलावे, अनिल शिंदे, अनिल पा. गावंडे, बि.एन.शेठ कड, सर्जेराव कड, रामेश्वर पा. जंजाळ, अरून गावंडे, रमेश चोरमारे, दामोधर ठाले, नाना सुरासे, विनोद जाधव, मुदत्सर पठाण, अंगद सहाने, पंढरिनाथ पाटील, रमेश पा. बरडे, आत्माराम खेकाळे, विजय मिरकर, ईश्वर पा.पांडे, पुंजाराम साबळे, अवचितराव देठे, भिकाजी पाथरकर, गजानन घोडे, शंकरराव गिरणारे, रामेश्वर गिरणारे, सुनील मोहिते, संदीप सहाने, सोमीनाथ धसाळ, रावसाहेब दाभाडे, दत्ता पाटील पुंगळे,पंडित पडोळ, कारभारी टेपले, शंकर नागवे, राजेंद्र पंडित, गजानन वनारसे, अमरसिंग चांदवाडे, रमेश चोरमारे, कैलास कड, रघुनाथ पांडे, संतोष बोर्डे,धनराज काळे, सुनील लोखंडे, प्रकाशजी जगताप यांच्यासह पंचक्रोषीतील शेतकरी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.