आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाची गरज:होमिओपॅथिक काळाची गरज; असे आवाहन गुरुमिश्रि होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षा डॉ.कांचन देसरडा यांनी केले

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होमिओपॅथिक ही काळाची गरज आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक तणावाचे जीवन जगत आहेत.त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे आवश्यक आहे.जास्त अभ्यास केला तर जास्त अडचणी येतात.अन नाही केला तर अडचणी येत नाही.विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे.पालकांनी तुमच्या पाल्यांचे पालकत्व आमच्याकडे द्यावे.आम्हीं त्यांना चांगले डॉक्टर बनवू, असे आवाहन गुरुमिश्रि होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षा डॉ.कांचन देसरडा यांनी केले.

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील गुरुमिश्रि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.योगेश देसरडा, प्राचार्य डॉ.बी.एल.दुधमल, पी.जी.डायरेक्टर डॉ.पाल, प्रा. डॉ.जुनेद फारुकी, डॉ.गोविंद थोटे, डॉ. मीनल राचेलवार, डॉ.लोकेश मंत्री, डॉ. रुपेश वाफेकर आदींची उपस्थिती होती. देसरडा म्हणाल्या, आज कित्येक डॉक्टर हे होमिओपॅथीचा उपचार करून लाखों रुपये कमवत आहेत. भविष्यात तुम्ही ही पदवी घेऊन विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता. आपले महाविद्यालय ग्रामीण भागात असले तर तंत्रज्ञानात कुठेही कमी नाही. वसतिगृहात विविध गुणधर्माचे विद्यार्थी असतात.

यातून विविध गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून नाव कमवावे. डॉ. योगेश देसरडा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन यश मिळवावे. आज प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. पालकांनीसुद्धा आपल्या मुलां-मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर पाटील यांनी तर डॉ. जे. सी. दरख यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...