आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या भारताला बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी राष्ट्रभक्ती व समर्पणभाव असलेली तरूण पिढी घडविण्याची खरी गरज आहे. ही पिढी आपल्या प्रेरणादायी इतिहासाची ओळख व संस्कारांतून घडेल असा विश्वास महाराष्ट्र इतिहास संकलन समितीचे सदस्य भास्करराव ब्रह्मनाथकर यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वामीविवेकानंद संस्कार केंद्र आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक मर्यादित.संभाजीनगर प्रायोजित केलेल्या स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेत ११ व्या वर्षातील दुसरे पुष्प हैद्राबाद मुक्ती संग्राम या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुरेंद्र अलुरकर होते. व्यासपीठावर संयोजक हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेलूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी पाठक हिने गायीलेल्या बलसागर भारत होवो //" या गीताने झाली. सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय व प्रास्ताविक हरिभाऊ चौधरी यांनी केले. करूणा कुलकर्णी यांनी आभार मानले. व्याख्यानासाठी सेलू शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद संस्कार केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.