आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कौशल्य ओळखून समाजाला पुढे नेण्याची गरज; अभिनेते गगन मलिक यांचे प्रतिपादन

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमानात आपण काय करतो, यावर भविष्यातील परिणाम ठरत असतो. तरुणांमधील कौशल्य ओळखून आगामी काळात त्यांची मोठी फळी निर्माण करून, त्यांना योग्य काम मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. तरुणांना काम मिळाले तरच समाजाची प्रगती होईल. रील लाईफ आणि रियल लाईफ यामध्ये अंतर आहे. आपल्या मधील क्षमता ओळखून धम्माच्या मार्गाने जात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करूया असे प्रतिपादन अभिनेते गगन मलिक यांनी केले.

मंठा येथे शासकीय विश्रामगृहात समाज बांधवांना अभिनेते गगन मलिक मार्गदर्शन करीत होते. पुढे बोलताना मलिक म्हणाले की, आम्ही बुद्धाने सांगितलेल्या शांततेच्या मार्गाचे पाईक असून, सर्व धर्माचा सन्मान करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी काळात आमचा प्रयत्न असणार आहे.

यावेळी थायलंड येथून आलेले बौद्ध भिक्षु, माता भगिनी यांच्यासह बाळासाहेब अंभिरे, अरुण वाघमारे, बाळासाहेब वाजोंळकर, राजेश खंदारे, प्रकाश घुले,ॲड सिद्धार्थ अवसरमोल, अशोक अवचार,मारोती खनपटे, सुरेश वाव्हळे, नानाभाऊ वाघमारे, गंगाराम गवळी, शरद मोरे, गौतम अंभोरे, मिलिंद अंभोरे, राहुल खरात, अजय मोरे, अनिल खरात, धम्मानंद वाघमारे, स्नेहल हिवाळे, जीवन भदर्गे, भगवान वाघ,महेंद्र टेकाळे, प्रदीप मोरे, अशोक खंदारे, विलास बनसोडे, अशोक खंदारे यांच्यासह असंख्य बौद्ध समाजबांधव, भगिनी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...