आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज ; भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांचे प्रतिपादन

फत्तेपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपारीक पध्दतीने करण्यात येणारी शेती ही शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवण भागविण्यापुर्ती पुरेशी ठरत असली तरी त्यातुन शेतकऱ्यांचे सुख समृध्दी व भरभराट होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया संपन्न करण्यासाठी पारंपारीक शेतीला फाटा देवुन आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहीत करणे ही काळाची गरज असुन कृषी विभागाने यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी केले. भोकरदन पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विनोद गावंडे, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते आदी उपस्थित होते. आ.दानवे यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या खरीप हंगापुर्व तयारीचा सखोल आढाव घेवुन शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते यांचा तुटवडा भासु नये म्हणुन कृषी विभागाने खत व बि-बियाण्यांचा काळा बाजार करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवुन शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना केली. त्याचप्रमाणे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही फडणवीस सरकारच्या काळातील अत्यंत महत्वकांक्षी व शेतकऱ्यांना सर्वांगिण विकास साध्य करणारी योजना असुन सदर योजना कृषी विभागाने युध्दपातळीवर राबवुण शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे आगामी खरीप हंगामध्ये पारंपारीक रित्या शेती करणाऱ्याना शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आदर्श आधुनिक शेतीचे उदाहरण म्हणुन प्रगतीशील शेतकऱ्यांची शेती बघता यावी याकरीता प्रत्येक गावातुन कापुस, मका व सोयाबीन या खरीप हंगामातील पिकांचे आधुनिक पध्दतीने उत्पादन घेण्यासाठी प्रत्येकी पाच शेतकऱ्यांची निवड करावी व त्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शनासह सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...