आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विशेषज्ञांचे आवाहन:गरजूंनी अल्पसंख्याक दर्जाचा लाभ घ्यावा ; जैन संघटनेच्या वतीने मार्गदर्शन मेळावा

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन समाजातील गरजुंनी अल्पसंख्यांक दर्जेचा लाभ घ्यावा, राष्ट्रीय विशेषज्ञ निरंजन जुवा यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.जैन भवनात झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन राज्य प्रभारी नंदकिशोर साखला यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रावक संघाचे समाज अध्यक्ष सुदेश सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, अशोक बिनायकिया, सुनिल सेठिया, माणिकचंद कासलीवाल, जिनदास वायकोस, दिपक चोपडा, मिना मुथ्था, मंजु कोटेचा, दिनेश राका आदींची उपस्थिती होती. अल्पसंख्यांक विषयाचे राष्ट्रीय विशेषज्ञ निरंजन जुवा यांनी राज्य व केन्द्र सरकाराची धार्मिक स्थळांची सुरक्षा, शैक्षणिक संस्थाचा विकास, महिला सक्षमीकरण, गरजु विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस योजना अंतर्गत १० टक्के आरक्षण आदी विषयावर प्रोजेक्टर स्क्रिनद्वारे मार्गदर्शन केले.

हस्तीमल बंब म्हणाले, समाजाच्या उन्नती, प्रगतीसाठी अनेक विधायक कामे राबविण्यात येते. समाजात गरजुंसाठी विशेष करून विद्यार्थीना शिष्यवृत्ती यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक मदत केंद्र उघडण्यात आले आहे. नवीन पिढी विद्यार्थी हेच समाजाचे व देशाचे भविष्य आहे. यासाठी आम्ही सर्वोत्तपरी सहकार्य करु. संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक मद्त कार्यशाळा राबवण्यात येईल. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी कैलास लुंगाडे, अजय पहाडे, राजेश बाठिया, पवन सेठिया, ताराचंद कुचेरिया, धनराज जैन, प्रकाश बोरा, नरेन्द्र मोदी, विजय सुराणा, रत्नदेवी सेठिया आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अॅड. अभय सेठिया यांनी तर चेतन देसरडा यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...