आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचाच डल्ला:दीड लाखाच्या दागिन्यांवर शेजारील मुलीचाच डल्ला

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारच्याकडे चावी ठेवली असता, त्या महिलेच्या २० वर्षीय मुलीने कुलूप उघडून जवळपास १ लाख ५२ हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना जालना शहरातील गांधीनगर येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गीता प्रभाकर सोनवणे या शहरातील गांधीनगर येथे राहतात. त्या शिलाई मशिन चालवितात. घरात पती, मुलगा व त्या राहतात. बाहेरगावी जायचे असल्यास, त्या नेहमी घराच्या बाजूला असलेल्या दुकानात चावी ठेवतात. त्या दुकानदार महिलेची मुलगी नेहमीच त्यांच्याकडे ये-जा करीत होती. गुरुवारी गीता सोनवणे यांच्याकडे नातेवाईक आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांना पाेहोचविण्यासाठी बसस्थानक येथे जायचे असल्याने त्यांनी बाजूला असलेल्या दुकानात चावी ठेवली होती. नंतर त्या नातेवाइकांना पाेहोचविण्यासाठी बसस्थानकात गेल्या होत्या.

एक वाजण्याच्या सुमारास गीता सोनवणे यांचा १० वर्षांचा मुलगा शाळेतून आला. त्याने घर उघडले, काही वेळाने गीता सोनवणे तेथे आल्या. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने पाहिले असता, त्यांना दागिने दिसले नाहीत. याची तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता शेजारच्याच मुलीने घर उघडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...