आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्ब संख्या:लायटिंगच्या माळेतील बल्बची संख्या घटली

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर निर्बंध हटवल्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाप्पांपुढे आरास, सजावटीचा वेगळे महत्त्व आहे. रोषणाईसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एलईडी लायटिंग माळेतील बल्बची संख्या १०० वरून ६० पर्यंत आली आहे. या साहित्यावरील जीएसटी १८ टक्के केल्याने उत्पादकांनी बल्बची संख्या कमी केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी किमती स्थिर असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दोन वर्षांनंतर प्रथमच यंदा गणेश मंडळांची संख्याही वाढली असून घराघरात मूर्तींची संख्या यावेळी अधिक असल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. आकर्षक मूर्तीसह रोषणाईचा झगमगाटही उत्सवाची शाेभा वाढवतो. यामुळे रंगीबेरंगी एलईडी लायटिंग माळा, तोरण, झुंबर, एकावेळी अनेक रंग बदलणारे लाइट आदी साहित्यास मागणी आहे. दिल्लीतील बाजारपेठेत जोडणी केलेल्या चायना एलईडी साहित्याची जालन्यात मागणी असून या साहित्याची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बाजारात विक्री झाली. लायटिंग माळेच्या किमती ५० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत.

ज्या माळेची किंमत पूर्वी ४०० रुपये होती ती यंदाही तेवढीच आहे मात्र यात वापरण्यात आलेल्या एलईएडी लाइटची संख्या घटली आहे. हा परिणाम वाढीव जीएसटीमुळे झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात बडे १० ते १२ व्यापारी आहेत. ज्यांनी थेट दिल्लीतून उत्सवासाठी झगमगाटाच्या वस्तू आणल्या आहेत. या माध्यमातून बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.

दिल्लीतील वस्तूंचे स्थान कायम
गणेशोत्सवासह गौरी पूजनासाठी यंदा झगमगाटाच्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या जीएसटीमुळे माळेतील बल्बच्या संख्येत घट झाली मात्र, किमती स्थिर असल्याने मागणीही होती. चायनाच्या दिल्लीत बनवलेल्या वस्तूने बाजारपेठेत स्थान टिकवून ठेवल्याचे चित्र यंदाही आहे. -राजेश खंडेलवाल, होलसेल विक्रेते, जालना.

बातम्या आणखी आहेत...