आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींचा संदेश:तापमानवाढीला तोंड देण्यासाठी झाडे जगवणे हाच एकमेव उपाय; ज्ञानेश्वर महाराज दौड यांचे ग्रामस्थांना कळकळीचे आवाहन

फत्तेपुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्यान चालू असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट होत आहेत. परिणामी २० ते २५ डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान हे आता ४० डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. ही समस्या जर अशीच चालू राहिली तर हेच तापमान ५० ते ६० पर्यंत जाऊन पोहोचेल. त्यामुळे निश्चितच थोड्या प्रमाणात उभे असलेले जंगल पेटतील, मानवी वस्त्या जळून राख होईल म्हणून एक एक झाड लाऊ, करु जमीन भरणा! झाली उघडी ही भूमी! तरी जीव हा सरणा!! ही कविता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दौड यांनी स्व लिखित या माध्यमातून झाडे झुडपे तोडणे थांबून प्रती माणूस ५ झाडे लाऊन ते झाडे जगवण्याचा निर्धार करायला हवा, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज दौड यांनी केले आहे.

भोकरदन तालुक्यातील मनापूर येथे सुरु झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची सेवा युवा किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दौंड यांची झाली. त्यांनी नामाचे चिंतन प्रगट पसारा! असाल जे करा जेथे तेथे!! या अभंगा वरती सुंदर निरूपण केले. यावेळी बोलताना महाराजांनी सांगितलं की, नामाचे चिंतन करुन त्याचा जर प्रगट पसारा केला तर हा जीव देव होतो. असे त्यांनी या अभंगाच्या निरुपणार्थ सांगीतले. शिवाय या कलियुगामध्ये जर माणसाला भगवंताला प्राप्त करायचे असेल नामचिंतनच हा एक उत्तम पर्याय आहे. आजच्या धावपळीच्या युगात कुणालाच भगवंताला द्यायला वेळ नाही. जरी भगवंतानी आपल्याला बनविले तरी आपण त्या विश्वनिर्मात्यालाच विसरून बसलो आहे.

कारण भौतिक सुखसुविधांनी परिपूर्ण असलेलं हे जीवन आपल्याला निश्चितच भगवंतापासून दूर खेचत आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आपण जीवनात आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण सतत देवाकडे प्रार्थना करतो आणि एकदा की त्या आपल्याला प्राप्त झाल्या की आपण त्या भगवंताला विसरून जातो. असे होता कामा नये त्याकरीता आपण सतत त्या भगवंताच्या ऋणात राहून त्याचे नामस्मरण करत राहिले पाहिजे जेणेकरून भगवंतालाही आपला विसर पडणार नाही. दरम्यान, व्यसनाधीनता स्रिभृणहत्या यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करुन समाजप्रबोधन त्यांनी कीर्तनातून केले. यावेळी किर्तनासाठी पंचक्रोशीतील तसेच गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती.

आईवडिलांची सेवा करा
आई-वडिलांची सेवा करायला हवी जेणेकरून आई-वडिलांची सेवा केल्याने भगवंत आपल्या अक्षम्य चुका दुर्लक्षित करून आपल्याला जवळ करेल. कारण ज्याने आईवडिलांची सेवा केली तोच व्यक्ती आज आत्मिक समाधानापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आईवडिलांना जपायला पाहिजे. कारण तुम्हाला या जगात सर्व काही मिळेल पण एकदा गेलेले आईवडील आणि त्यांचं प्रेम कधीच आपल्याला मिळू शकणार नाही असेही ह.भ.प. दौड यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...