आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • The Poet Mandali Struggles To Live With Optimism By Carrying The Torch Of Revolution In A Class Rejected By Society; Social Reality, Grief, Light Shed In The Direction |MARATHI NEWS

जेईएस महाविद्यालयात कविसंमेलन:कवींनी मांडली समाजाने नाकारलेल्या वर्गामध्ये क्रांतीची मशाल घेत आशावादाने जगण्याची धडपड; सामाजिक वास्तव, व्यथा, दिशावर टाकला प्रकाश

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या वेळी चांगली सर्व्हिस दिली तर बक्षीस देईल असं प्रत्येक वेळी म्हणणारा तो आठवला की.... आंबा पचकन् पिचकारी मारते पानांची अंबाबाईकडे जाणाऱ्या देवळाच्या वाटेवर....! “श्रद्धेच्या ठिकाणी होणारी कुकर्म, तरुणाईच्या डोक्यात बिंबवली जाणारी हिंसा, गर्भातील स्त्री अर्भकाची गांधारी होण्याची इच्छा, समाजाने नाकारलेल्या वर्गात क्रांतीची मशाल घेऊन नवीन आशावादाने जगण्याची धडपड, अशा सामाजिक वास्तवांवर आधारित बहारदार रचनांनी कवितेच्या पाडव्याचे कविसंमेलन गाजले.

जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात “दु;खी’ राज्य काव्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या निमंत्रित कवींच्या कविसंमेलनात रेखा बैजल, प्रज्ञा पवार, डॉ संजीवनी तडेगावकर, दिशा पिंकी शेख, संजय चौधरी यांनी विविध विषयांवर आधारित एकापेक्षा एक सुरस रचना सादर केल्या. त्यांना रसिकांनी तेवढाच उत्तम प्रतिसाद दिला. मुलं हेच स्त्रीसाठी खरा दागिना असून तिला दुसरी अपेक्षा नसते तिच्या मनातील दागिन्यांची वर्णन करणारी कविता संजय चौधरी (नाशिक) यांनी सादर केली. आई म्हणाली “बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी, तुझ्या कोवळ्या हातांनी अन् धडधडू दे इवलसं हृदय... माझ्या वक्षांवर यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना ....’ मातेची ममता, वात्सल्य प्रत्येकाने जीवनभर जपावी अशी अपेक्षा कवितेतून व्यक्त केली. विद्रोही परंपरेच्या वारसदार डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढ्यांमध्ये धर्म, द्वेष, हिंसा पसरविण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने कार्य सुरू आहे.

तरी सत्य वाचविण्यासाठी एका वर्गाची सुरू असलेली धडपड, प्रसंगी बळी पडणे अशा वास्तवावर आधारित रचना डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी सादर केली. “लहान मुले, तरुणांच्या तरतरीत मेंदूत लाखो करोडो प्रश्न कारंजासारखे उसळतात. त्यांना बंदुका, लाठ्या-काठ्या , हिंसेचे आकर्षक पासवर्ड....! “एकीकडे असे वातावरण असताना लेखनातून आशावाद व्यक्त करणाऱ्या रचनेने झणझणीत वास्तव उलगडले. भावकवयित्री डॉ संजीवनी तडेगावकर यांनी “अस्वस्थ किनाऱ्यावरती या मुजोर झाल्या लाटा देहाच्या पागोळीतून शिरशिरतो ओला काटा...! “पती- पत्नी, प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील ओलावा व्यक्त करणारी कविता सादर करत वेगळे चैतन्य निर्माण केले. स्त्री जन्मापूर्वीपासून तिच्या वाट्याला येणारे दु:ख, भोगाव्या लागणाऱ्या यातना यातून स्त्री म्हणजे केवळ उपयोगासाठी पृथ्वीवर अवतरली. असा गर्भीत आशय असलेली ‘गर्भस्थ’ रचना रेखा बैजल यांनी सादर केली. “आता मलाही वाटतं आपण गांधारी व्हावं आणि शंभर कुंभांमध्ये हे आजन्मी अंश गर्भस्थ करावे” या रचनेने उपस्थितांना अंतर्मुख केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कविसंमेलनात सहभागी कवींनी एकापेक्षा एक सुरस रचना सादर केल्या पाडव्याच्या परंपरेनुसार खचाखच भरलेल्या रसिकांनी शेवटपर्यंत थांबून उदंड प्रतिसाद दिला.

आभाराचे भार कशाला... आता फुलांचे हार कशाला
संजय चौधरी यांच्या अत्यंत गाजलेल्या “आभाराचे भार कशाला... आता फुलांचे हार कशाला, हृदयात बांधू घर अशा घराला दार कशाला ?” या कवितेने कविसंमेलनाचा समारोप झाला. पंडितराव तडेगावकर यांनी शेवटी आभार मानले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाला कधी स्तब्ध, नि:शब्द, अंतर्मुख होत मराठवाड्यासह विदर्भातील साहित्य रसिकांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

बातम्या आणखी आहेत...