आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:पालकमंत्री राजेश टोपे यांची बैठक सुरू असताना शेतकऱ्याने घेतले विष

जालना7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमीन हडप करणाऱ्या सावकारावर कारवाई केली नसल्याने उचलले पाऊल

जमीन हडप करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकारावर कारवाई करण्याची मागणी करत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या वेळी पालकमंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत होते. प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्या शेतकऱ्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. विलास लासीराम राठोड (पाथ्रुड, ता. जि. जालना) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विलास लासीराम राठोड या शेतकऱ्याने पोलिस अधीक्षकांना तसेच संबंधितांना सावकाराविरुद्ध कारवाईसाठी निवेदन दिले होते. मात्र, पोलिसांसह महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने त्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे आढावा बैठक घेत होते. विलास राठोड याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्त तैनात केला. टोपे यांची बैठक होईपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता. तत्पूर्वीच या शेतकऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते.

रोषणगावात टोपेंना घेराव
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर सायंकाळी पालकमंत्री अतिवृष्टी,पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे झालेले नुकसान पाहणीसाठी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे पोहोचले. त्यांनी बॅटरीच्या उजेडात नुकसानीची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी धोपटेश्वर व रोषणगाव येथील काही शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांना घेराव घातला.

बातम्या आणखी आहेत...