आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पोदार शाळेतील विद्यार्थ्यांशी पोलिसांनी‎ साधला संवाद, मार्गदर्शनही केले‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पोलिस काका- पोलिस दीदी‎ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत तालुका पोलीस‎ स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोद्दार इंटरनॅशनल‎ शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला‎ पोलीस कॉन्स्टेबल माधुरी फुके यांनी विद्यार्थिनींना गुड‎ टच-बॕड टच संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिस‎ उपनिरीक्षक सय्यद माजिद, पोलिस नाईक किशोर जाधव‎ आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना शाळा व‎ महाविद्यालय परिसरातील मुलींसोबत होणारी छेडछाड,‎ रॅगिंग, वाहतूकीचे नियम, अंमली पदार्थांचे सेवन आणि‎ सायबर क्राईम इत्यादी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी‎ आणि विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित‎ करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे उपनिरीक्षक सय्यद‎ माजेद यांनी सांगितले. यावेळी शाळेचे‎ मुख्याध्यापक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या‎ संख्येने उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...