आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:टपाल कार्यालयास संरक्षण भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा वावर

अंबड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात निजामकालीन टपाल कार्यालय गांधीनगर परिसरात असुन या परिसराला संरक्षण भिंत नसल्याने दिवसभर मोकाट जनावरांचा वावर असतो. सुसज्ज व मोठे क्षेत्र असलेल्या टपाल कार्यालयात दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येत असतात मात्र परिसरातील दुर्गंधी व घाणीमुळे नाराजी व्यक्त करतात.

सध्या कार्यालयाच्या आवारात म्हशी बांधलेल्या असतात. टपाल कार्यालयात काम करणारे टपालमास्तर, पोस्टमन व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र कार्यालयाला संरक्षण भिंत नसल्यामुळे सायंकाळी अथवा सुट्टीच्या दिवशी भटकी कुत्री, डुक्कर या परिसराचा ताबा घेवून परिसर घाण करतात. कार्यालयात पाणी असुन कार्यालयीन कर्मचारी यांची झाडे लावण्याची व जगवण्याची तयारी असली तरी संरक्षण भिंतीमुळे लावलेल्या झाडांचे जतन होवू शकणार नाही. यासाठी तातडीने संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता असल्याची मागणी जोर धरीत आहे.

बातम्या आणखी आहेत...