आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव:कापसाला 8 हजार 500 रुपयांचा भाव

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर बाजार समिती येथे भारतीय कपास निगम लिमिटेड सीसीआय मार्फत कापूस खरेदी शुभारंभ प्रशासक शरदराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कापसाला प्रतिक्विंट्टलचा ८ हजार ५०० रूपयांचा भाव देण्यात आला आहे.

कापूस खरेदीचा शुभारंभ आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आला. या वेळी प्रथम लाभार्थी कंडारी येथील शेतकरी साहेबराव खाडे या शेतकऱ्याचा भारतीय कपास निगमचे धिरजकुमार यांनी सत्कार केला. या वेळी भारतीय कपास निगमचे जाधव, बाजार समितीचे सचिव सुरेश जिगे, ज्ञानेश्वर चंद, कैलास उनगे, राजू निहाळ, राहुल तायडे, रमेश तिडके, योगेश खैरे, शेतकरी व व्यापारी ज्ञानेश्वर नन्नवरे, प्रेमचंद तेटवार, नंदकिशोर शेळके, शाम दुधानी, राम जऱ्हाड, शेख समीर, शेख रफीक, शेख जमील आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...