आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांत समाधान:लाल मिरचीला मिळतोय 12 ते 25 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव

शेलूद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूदसह व परिसरात खरीप हंगामात ठिबक सिंचनावरील मल्चिंग पेपरवर लागवड केलेल्या मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

सध्या बाजारात मिरचीची आवक घटत चालल्याने डॉलर लाल मिरची १२ हजार रुपये, तर वाळलेल्या मिरची २५ हजार रुपये क्विंटलने खरेदी केली जात असल्याने लाल मिरची उत्पादकांना मालामाल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भोकरदन तालुक्यातील शेलूदसह परिसरात वालसावंगी, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, आन्वा, लिहा, वडोदतांगडा, धावडा, वाढोणा, शेलुद, हिसोडा, कोळीकोठा आदी भागात लाल मिरचीचे मोठे क्षेत्र आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे मिरचीचे माहेरघर असल्याने येथून दर रविवारी ४ ते ५ वाहनाने हजारो क्विंटल लाल मिरची परिसरातील शेतकरी चारचाकी वाहनाने नागपूर, मुंबई, दिल्ली येथे पाठविली जाते.

मागील जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात हिरवी मिरची सुरूवातीपासून ४० ते ६० रूपये किलो प्रमाणे कायमस्वरूपी भाव मिळाला होता. मात्र अनेक मिरची उत्पादकांनी एकरी हिरवी मिरचीत ५ लाखांचे उत्पन्न घेतले. परंतु परतीचा अवकाळी पाऊस व दोन वर्षापासून मिरची पिकांवर पडलेला चुरडामुरडा रोगाचा प्रादुर्भावामुळे मिरची लागवडीकडे मिरची उत्पादकांचा कल दिवसेंदिवस घटल्याने जाहीर लिलावात आवक कमी झाल्याने मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने या परिसरातीलमिरची उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

परिसरात मिरचीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
सध्या वाळलेली लाल मिरचीला नागपूर येथील मार्केटमध्ये १२ हजार रूपयापासून ते २५ हजार रूपये भाव मिळत असून पिकांवरील झालेला खर्च निघून जेमतेम एकरी ५ लाखांचे उत्पन्न मिळत असून पुढील वर्षी मे महिन्यांत २ एकर मिरची लागवड करणार असल्याचे शेलूद येथील महिला शेतकरी रेखा दारकुंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...