आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन:गाळपाला एफआरपीपेक्षा 350 रुपये जास्त भाव द्यावा : माजी खासदार शेट्टी

वडीगोद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी बाजारात साखरेला चांगला भाव मिळाला आहे. मागील वर्षीही साखरेला चांगला भाव मिळाला होता. इथेनॉलच्या माध्यमातून चांगला पैसा कारखान्याला मिळाला आहे. यामुळे कारखानदारांनी एफआरपीपेक्षा २०० रुपये जास्त भाव मागील गाळपाला द्यावा व या वर्षीच्या गाळपाला एफआरपीपेक्षा ३५० रुपये जास्त भाव द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी वडीगोद्री येथे घेण्यात आलेल्या पहिल्या ऊस परिषदेत केली.

पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आज शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीसाठी एकरी १० ते २० हजार रुपयांची खंडणी मागितली जाते, त्यावर नियंत्रण आणावे या मागण्या घेऊन आम्ही ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे मोर्चा काढणार आहोत. सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर १६, १७ व १८ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर ऊसतोड बंद करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटित शक्तिप्रदर्शन करणार आहे. या वेळी ऊसतज्ज्ञ जालिंदर पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, शिवाजी भोसले, शिवाजी हुसे, प्रशांत डिक्कर, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...