आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गुरुवारी भरणारा आठवडी बाजार आणि रविवारच्या मंडई मध्ये भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने या बाजारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरीत मुबलक पाणी आहे.
त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत बऱ्याच शेतकऱ्यांनी सुध्दा मुळा, मेथी, वांगे, गवार, चवळी, भेंडी, कोंथबीर, टमाटा, गाजर, फुलकोबी, पत्ताकोबी, मिरची, काकडी आदी भाजीपाल्याची मोठा खर्च करून लागवड केली आहे. भाजीपाल्यातुन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती लागेल अशी अपेक्षा होती. परंतु सगळीकडेच भाजीपाल्याचे प्रचंड उत्पादन झाल्याने व बाजार आणि मंडईत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.