आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजपूत समाजाने महाराणा प्रतापसिंह यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनात त्यांचा विचारांचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
भोकरदन येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार किशोर पाटील आमदार उदयसिंग राजपूत, राजाभाऊ देशमुख, विजय परिहार, एसडीएम अतुल चोरमारे, बीडीओ दयसिंग राजपूत, डॉ. रघुवीर चंदेल, विजयसिंह पवार आदी उपस्थित होते. जयंती निमित्त पंचायत समिती कार्यालयासमोरुन सकाळी मोटारसायकल रॅलीची काढण्यात आली. सायंकाळी ढोलताशांच्या गजरात महाराणा प्रतापसिंह यांची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली.
या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात काठी फिरवण्याचे प्रदर्शन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रारंभी उत्सव समितीचे अध्यक्ष महादूसिंग डोबाळ यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. सचिन देवरे यांनी आपल्या व्याख्यानातून महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आमदार किशोर पाटील यांनी राजपूत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या भाषणातून समाजाच्या एकजुटीचे महत्त्व सांगितले.
मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सिल्लोड येथील महाराणा प्रताप चौकात येणाऱ्या जयंती पर्यंत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या उभारण्यात येईल, असे सांगून भोकरदन जाफराबाद शहरातही येणाऱ्या काळात महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासनही दिले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा व संस्थाचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये जीवनगौरव, प्रशासकीय, कृषि, वैद्यकीय, उद्योग, समाजसेवा, कला, क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष महादूसिंग डोभाळ, हुकूमसिंग चुडावत, डॉ. के.एन.राजपूत, संजय खंडाळकर, राजू खंडाळकर, मानसिंग डोभाळ, पांडुरंग पवार , रामसिंग डोभाळ, रवींद्र बिलवाल, कबीरचंद भोपळे, अनंता सोळंके, विशाल महाले, दारासिंग घुनावत, प्रतापसिंह घुनावत, रंजीत खंडाळकर, गजानन गुसिंगे, पवन ताटू, अशोक आहेर, राजेंद्र दारुटे, केशव जारवाल, फुलसिंग शिंदे, भगवानसिंग बैनाडे, विनोद खंडाळकर, गोकुळसिंग मंडावत, दिनेश डोभाळ, विजय सोनेत, राजेंद्र डेडवाल, विजयसिंग डोभाळ आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय शास्त्री, सतिष शिरसाठ यांनी तर रणजित डेडवाल यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.