आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:प्रादेशिक मनोरुग्णालयाची इमारत बहुमजली नको; आरोग्यमंत्री टोपे यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुंबेफळ शिवारात सहा हेक्टरवर साकारण्यात येणाऱ्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी औरंगाबाद कार्यालयास पाठवला. मात्र, याला मंजुरी देण्यापूर्वी मुंबईत मंत्रालयात मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे व मनोचिकित्सक क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केले असता, इमारत बहुमजली नव्हे तर जमिनीलगतच करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार आराखड्यात बदल करून पुन्हा हा प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीसाठी ५८ कोटी तर निवासस्थान बांधकामासाठी ९४ कोटी मंजूर झालेले आहेत. या कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी मुख्य अभियंता (प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम, औरंगाबाद) यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी आयोजित बैठक बोलावली. या वेळी सचिवस्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, इमारतीची रचना, वॉर्डांची स्थिती व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...