आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम:​​​​​​​कोरोनानंतर दिंडी परंपरेला पुन्हा सुरुवात; मोहळाई ते शेगाव 110 भाविक रवाना

पिंपळगाव रेणु.4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथुन श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शेंगावकडे पायीवारीसाठी जवळपास ११० महिला व पुरुष भक्त सोमवारी सकाळी रवाना झाले.या वेळी त्यांना निरोप देण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडीस यावर्षी अकरावे वर्षे आहेत. यामुळे गावात भक्ती मय वातावरण निर्माण झाले होते.

याव्यतिरिक्त दरवर्षी मोहळाई येथून श्रीक्षेत्र पंढरपूर, ओंकारेश्वर, मुक्ताई नगर, राजुर व आदी तीर्थक्षेत्राच्या पायी वारी ह.भ.प. शिवाजी महाराज काकडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. श्रीक्षेत्र शेंगाव येथून परतल्यानंतर १० एप्रिल रोजी श्रीरामनवमी ला ग्रामस्थ च्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पायीवारी परतल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सततच्या या वारीमुळे सर्व भाविक भक्तांमध्ये कौंतुकाचे वातावरण निर्माण होऊन संपुर्ण गाव साप्रंदायिकमय झाले आहे. मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेला कोरोना काळामुळे काही प्रमाणात ब्रेक लागला होता. दरम्यान, यावर्षी सुट मिळाल्यानंतर ही परंपर नियमीत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...