आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार : खरात

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असून लहानात लहान व्यक्तीला व तृतीयपंथी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रियदर्शनी बँक नेहमीच अग्रेसर असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विलास खरात यांनी केले.

जिल्ह्यातील तृतीयपंथी लोकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात हातभार लागावा म्हणून भारत सरकारचा डिजिटल प्रोग्रामचा एक भाग म्हणून युपीआय, भिम, क्यूआर कोड, बाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वर्षानुवर्षे तृतीयपंथीयांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. या समाजाला मुलभूत मानवी हक्क मिळविण्यासाठी देखील झगडावे लागत आहे. ओळखपत्रे, मालमत्ता हक्क, निवारा अशा विविध बाबींसाठी आजही यांच्या उन्नती व प्रगतीसाठी व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचण्याची आवश्यक असल्याचे माजी आमदार विलास खरात म्हणाले.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी, नितिन पगारे, किसन शिंदे, सुरेश कदम, मुकुंद मुंढे, अशोक पवार, शाखाधिकारी प्रदीप परिहार यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...