आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:मतदान लोकशाहीचा अधिकार

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा आधिकार इतर सर्व अधिकारांपेक्षा अधिक महत्वाचा आहे. आपल्याला अभिप्रेत असलेली शासन प्रणाली विकसित करण्यात मतदाराचा अधिक वाटा असतो.मतदानाच्या माध्यमातून चांगले लोकप्रतिनिधी निवडणे हा विकासाचा पहिला टप्पा मानला जातो. विशेषतः युवकांची भूमिका यात अधिक महत्वाची मानली जाते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान या लोकशाहीच्या उत्सवात तरूणांनी, युवकांनी जाणीवपूर्वक सहभागी झाले पाहिजे, असे मत परतूरच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी व्यक्त केले आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होते.शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत नाईकनवरे, प्रा. शंकर चव्हाळ,प्रा. प्रदीप चव्हाण, प्रा. प्रदीप साळवे, लिंबाजी कदम, वंदना प्रक्रिये, नितीन मुजमूले, अरुण चंदणे, एस. जी. साबळे, तलाठी अशोक यादव, एस. के. खणपटे आदींची उपस्थिती होती. एकनाथ कदम, विक्रम वाघमारे, दत्ता लवंगारे होते.

बातम्या आणखी आहेत...