आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती,‎ कस्तुरबा गांधी विद्यालय‎ याच रस्त्यावर‎:मंठा आयटीआयकडील‎ रस्त्याची झाली दुरवस्था‎

मंठा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आयटीआयकडे जाणाऱ्या‎ रस्त्याची दुरवस्था झाली असून‎ मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी व‎ कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा‎ लागत आहे. या रस्त्यावरच पंचायत‎ समिती कार्यालय, कस्तुरबा गांधी‎ विद्यालय असून पावसाळ्यात‎ गुडघाभर चिखलातून वाट काढावी‎ लागते अशी रस्त्याची बिकट‎ परिस्थिती निर्माण झाली आहे.‎ या रस्त्यावर सर्वात शेवटी‎ आयटीआय असून मंठा तालुका व‎ तालुक्याच्या बाहेरील अनेक‎ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी‎ आयटीआयमध्ये येतात. या‎ आयटीआयमधील उत्कृष्ट‎ शिक्षणाची व नियोजनाची महाराष्ट्र‎ शासनाने दखल घेतलेली आहे.‎

मात्र आयटीआय, पंचायत समिती‎ कार्यालय व कस्तुरबा गांधी‎ विद्यालयाकडे जाण्यासाठी कच्चा‎ रस्ता असून पावसाळ्यात या‎ रस्त्यावर चिखल होतो. रस्त्याच्या‎ दुरवस्थेबाबत विद्यार्थ्यांसह‎ पालकांनीही अनेकदा संबधित‎ विभागासह लोकप्रतिनिधीकडे‎ वारंवार तक्रारीही केलेल्या आहेत.‎ परंतु कुणीच गांभीर्याने घेतले‎ नसल्याने रस्त्याची वाताहात झाली‎ आहे. दरम्यान, रेणुकामाता मंदिर,‎ तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या‎ रस्त्यासह आयटीआय, पंचायत‎ समिती कार्यालय व कस्तुरबा गांधी‎ विद्यालयकडे जाणारा रस्त्याचे‎ डांबरीकरण करावे, अशी मागणी‎ करण्यात येत आहे ‎.‎