आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्याला प्राप्त झालेली परमार्थीक अनुभूती जीवनाला दिशा देणारी आहे. मनुष्याचे जीवन म्हंटले की त्यात अनुभव येणाारच. जगतामध्ये कोणताही प्राणी असला तरी त्यच्या जीवनात अनुभव येणारच. अनुभवाशिवाय जीवन ही संकल्पना आपल्याला विचारात घेताच येणार नसल्याचे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.
मंठा तालुक्यातील पाटोदा येथेअशोक महाराज इदगे यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. चौथ्या दिवशीचे कीर्तन पुष्प गुंफतांना आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया या जगदगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण केले. अनुभव फक्त माणसानाच असतात का तर ते नाही पूथ्वीतलावरील सर्व प्राण्यानां अनुभव असतात रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला सुध्दा त्याच्या आयुष्यामध्ये अनुभव असतात. एखाद्याच्या दारामध्ये गेल्यावर भाकरी मिळायच्या ऐवजी त्याच्या पाठीत लाकूड घातले तर दुसऱ्या दिवशी ते कुञ विचार करत की कालचा अनुभव चांगला नाही असा जीव या जगताच्या पाठीवर नाही की ज्याला अनुभव नाही.
परंतू अनूभवाने सगळे संपन्न असले तरी सुध्दा मनुष्याच्या जीवनात जोपर्यन्न परमार्थीक अनुभव येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाची ऊंची नाही. जीवनाचे मुल्य नाही मनुष्याला येणाऱ्या अनुभवावरून त्याच्या जीवनाचे मूल्य ठरत असते. मनुष्याला प्रपंचात येणारे अनुभव आणि परमार्थात येणारे अनूभव याचे विपरीत परिणाम आहे. प्रपंचाचा अनुभव मनुष्याला येत असला तरी त्या प्रपंचाच्या अनुभवाला फार मूल्य नाही.
जगदगुरू तूकाराम महाराजानी जीवन व्यथित करताना प्रपंचाचा अनुभव जरी हा अनुभव वाटत असला तरी त्या अनुभवामध्ये तथ्य नाही कारण त्या अनुभवातून माणसांच्या जीवनात काही फल प्राप्ती होत नाही. ज्ञानोबारायांना पंधराव्या अध्यायात प्रांपचीक आयुष्याच्या मर्यादा विषद केल्या आहेत. प्रपंचाच्या अनुभवाचा इतकी लायकी नाही आणि परमार्थाचा अनुभव आपण घ्यावा इतकी आपली लायकी नाही. प्रपंचामध्ये अनुभवाचा विषय चांगला नाही आणि परमार्थामध्ये अधिकाराचा अनुभवाची अनुऊपलब्धी आणि परमार्थ आणि अनुभवाचा अधिकार्याच्या विषयाचे प्राबल्य म्हणजे प्रपंच होय. अनुभवी माणसाला आजही ग्रामीण भागात आदराचे स्थान आहे. तोच व्यवहार अनुभवी माणसाच्या बाबतीत शहरात दिसून येत नाही.
मनुष्याच्या जीवनात काही तरी हेतू असणे गरजेचे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरी गाथा हरीपाठाचे चिंतन करणे गरजेचे आहे यासाठी आयुष्यात परमार्थिक साधनेची जोड असणे आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जे वजन येते त्याच्या आयुष्यामधील येणाऱ्या अनुभवातुनच त्याचे महत्व ठरत असते. असे महाराजांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण बनले आहे.
प्रपंच करायला सोपा
प्रंपच करायला काहीही लागत नाही. प्रपंच प्राणीमाञ सुध्दा प्रपंच करू शकतात. प्रपंच ही एक प्रक्रिया आहे. ती सरळ आहे बसून राहिला तरी प्रपंच होतच असतो. ढेकणाचा सुध्दा प्रपंच मनुष्यापेक्षा दहा पटीने मोठा आहे. प्रपंच करण्यासाठी बुध्दीमत्ता लागते असे नाही बसून राहिला तरी तो होतो. पण तीच गोष्ट परमार्थात होत नाही. परमार्थात परिश्रम करावे लागतात साधना करावी लागते तेव्हा कुठे वैकुंठ प्राप्त होते, असेही देगलूरकर महाराजांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.