आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेली ३०७ ही कलम तात्काळ वगळण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार कैलास गोरंटयाल यांनी केली आहे. दरम्यान,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवार रोजी जालना येथे सर्व आंबेडकरी व बहुजन चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या.मात्र, त्याकाळी त्यांनी शासनाचे कोणतेही अनुदान न घेता भिक मागून शाळा चालवल्या असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह देशात आपल्या कार्यामुळे लौकिक मिळवलेल्या उपरोक्त महापुरुषांचा अपमान झाल्याची भावना तमाम आंबेडकरी व बहुजन बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काल पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी हजेरी लावल्यानंतर परतत असताना बहुजन चळवळीतील एका पदाधिकाऱ्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक केली.या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी सदर पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा कलमाखाली गुन्हे दाखल केले असून त्यात कलम ३०७ चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. शाईफेक झालेली असताना प्राण घातक हल्ल्याची कलम दाखल करणे अत्यंत चुकीचे असून या कलमासह अन्य गंभीर स्वरूपाच्या कलमा तात्काळ कमी करण्यात याव्यात अशी मागणी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केली व पदाधिकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल निषेध व्यक्त करून मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.