आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे आणि सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही तोवर विधिमंडळाचे १९ तारखेपासून सुरू होणारे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला. जालना येथे शिवसन्मान आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगड येथे “जागर शिवसन्मानाचा’ हे लाक्षणिक आंदोलन केले. त्याच्या समर्थनार्थ जालना येथे महाविकास आघाडी व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार गोरंट्याल बोलत होते.
संजय लाखे यांची जीभ घसरली : या आंदोलनप्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवरायांचा अवमान होतो तेव्हा मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. मात्र सावरकरांचा अवमान झाल्यानंतर त्यांचे पित्त खवळते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वैचारिक पितृत्व कोणते, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा एकेरी उल्लेख लाखे पाटलांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.