आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेला शिवीगाळ:मुलाने वडिलांचे डोके फोडले

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुनेला शिवीगाळ का करतोस अशी विचारणा करणाऱ्या वडिलास शिवीगाळ करीत मुलाने खोऱ्याचा दांडा डोक्यात मारून वडिलांचे डोके फोडल्याची घटना गदळेवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गदळेवाडी ( ता. केज ) येथील सचिन मधुकर जाधव हा १७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी अश्विनी हिस तू येथे कशाला काम करतेस असे म्हणत शिवीगाळ करीत होता. यावेळी त्याचे वडील मधुकर बाबुराव जाधव ( वय ७० ) व त्यांची पत्नी या दोघांनी सुनेला का शिवीगाळ करतेस अशी विचारणा केली असता सचिन जाधव याने तुम्ही आमच्या पती - पत्नीच्या भांडणात पडू नका असे म्हणत शिवीगाळ करीत वडील मधुकर जाधव यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारून डोके फोडले. अशी तक्रार मधुकर जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...