आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा सप्ताहाचे आयोजन:फुटबॉल क्रीडा स्पर्धेने क्रीडा सप्ताहास प्रारंभ

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलात फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे फेरोजअली मौलाना यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा संघटक चाँद पी.जे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे फुटबॉल खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मोहंमद शेख, राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी आदींची उपस्थिती होती. उपस्थित खेळाडूंना फेरोजअली मौलाना यांनी मार्गदर्शन केले. सदर क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक मोहंमद शेख, हारूण खान, शेख इस्माईल, सिमोन निर्मळ आदी परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...