आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राेहिलागडला जिल्ह्यातील पहिल्या निपुण केंद्राचा दर्जा‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निपुण भारतअंतर्गत अध्ययन स्तर तसेच‎ माता पालक गट ही संकल्पना यशस्वीरीत्या‎ अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग देत राबवून दहा जि.‎ प. च्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता‎ वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या अंबड‎ तालुक्यातील रोहिलागड केंद्राला‎ जिल्ह्यातील पहिले निपुण केंद्र म्हणून दर्जा‎ मिळाला आहे. यामुळे नुकताच या केंद्राचा‎ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच‎ शिक्षण विभागाकडून गौरव करण्यात आला‎ आहे. या केंद्राच्या शाळांतील विद्यार्थ्यांची‎ गणित, भाषेचा अध्ययन स्तर ७० पेक्षा‎ अधिक झालेला आहे.‎ जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या‎ शाळेतील विद्यार्थ्यांचा अध्ययननिष्पत्ती स्तर‎ वाढवण्यासाठी शिक्षण विभाग तसेच‎ डायटकडून विविध उपक्रम हाती घेण्यात‎ आले आहेत.

याअंतर्गंत माता पालकांचाही‎ समावेश केला आहे. त्यांना गणित पेटी‎ तसेच शैक्षणिक साहित्याची ओळख तसेच‎ वापर याबाबत शिकवले जात आहे.‎ त्याबराेबरच अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग या‎ पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना‎ अवघड विषय सोपे करण्यासाठी प्रयत्न‎ केले जात आहे. जे केंद्र जिल्ह्यात उत्कृष्ट‎ काम करेल त्यांना जिल्ह्याचा मान दिला‎ जात आहे. याचा पहिला मान अंबड‎ तालुक्यातील रोहिलागड या केंद्राने मिळाला‎ आहे.‎ दरम्यान, निपुण भारतअंतर्गत‎ अध्ययननिष्पत्ती यासाठी कच्च्या‎ विद्यार्थ्यांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून‎ शंभर टक्के गुणवत्ता प्रदान करावी, असे‎ डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांगितले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे,‎ अधिव्याख्याता संजय येवते, योगेश जाधव,‎ श्रीहरी दराडे, जालिंदर बटुळे, प्रेरणा मोरे,‎ तर विषयतज्ज्ञ मार्गदर्शक जगन वायाळ,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण,‎ केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे, बीआरसीचे‎ सतीश देशमुख, कैलास गायकवाड, सरपंच‎ रामकाका खांडेभराड आदींची उपस्थिती‎ होती.‎

पहिली ते आठवीच्या‎ विद्यार्थ्यांवर प्रयाेग‎ या केंद्रातील १० शाळांतील इयत्ता पहिली ते‎ ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर हा प्रयाेग राबवला‎ आहे. ज्या ठिकाणी ७२ माता पालक गटाची‎ स्थापनाही केली आहे. हे केंद्र मॉडेल म्हणून‎ भूमिका बजावणार आहे. तसेच लवकरच‎ राज्याचे प्रकल्प (एमपीएसपी) संचालक‎ सूरज मांढरे यांची टीम रोहिलागड केंद्रास‎ प्रत्यक्ष भेट देऊन गुणवत्तेबाबत पडताळणी‎ समुपदेशन, मार्गदर्शन करणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...