आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगणात खेळत असलेल्या सतरा महिन्यांच्या बालकाच्या गालाचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत लचका तोडल्याची घटना भोकरदन तालुक्यातील देहेड येथे शनिवारी दुपारच्या वेळी घडली. मुस्तकीन फेरोज शहा असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील देहड येथील मुस्तकीन हा अंगणात खेळत होता. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवून त्याच्या गालाला चावा घेतला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर कुत्रा पळून गेला. परंतु या घटनेत मुस्तकीन गंभीर जख्मी झाल्याने त्याला लगेच भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून देखील त्याला जालना येथे हलविण्यात आले. जालना येथील डॉक्टरांनी देखील त्याच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलविले. परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्याने औषधी उपचारासाठी पुरेसे पैसे शहा यांच्याकडे नसल्याने त्यांनी आपल्या मुलाला घरी आणले आहे. ग्रामस्थांनी जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये वर्गणी जमा करून मुस्तकीनच्या उपचारासाठी मदत करून सामाजिक दातृत्व पार पाडून इतरांना देखील मदतीचे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.