आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील विद्यार्थीनींनी पोलिस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. पोलिस स्टेशन मध्ये असलेल्या विविध शस्त्राची माहिती देखील विद्यार्थिनींनी पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्याकडून जाणून घेतली. लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सोमवारी या संपूर्ण कारभाराची माहिती घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभुरे यांनी विद्यार्थिनींना पूर्ण पोलिस ठाणे दाखवत कुठे काय कारभार चालवतो याबद्दल माहिती दिली.
तसेच मुलींचे अधिकार,त्यांना कायद्याचे असलेले संरक्षणाबद्दल माहिती दिली. पोलिस सेवेत येण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी, लेखी चाचणीचे स्वरूप आदी बाबत पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, राम हाडे, नितीन बोडरे, सतिष जाधव, गोपनीय शाखेचे संजय वैद्य, गजानन राठोड, गाढवे, कैलास खंदारे, सुरेश मसलकर, रामप्रसाद नवल, उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.