आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भाडेकरूस पहिल्या मजल्यावरून फेकले, निवृत्त सहायक फौजदारासह त्याच्या पत्नीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाडेकरूला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त सहायक फौजदारासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहरातील योगेशनगर भागात ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली.

सुभाष बारोटे असे संशयित सहायक फौजदाराचे नाव आहे. आकाश देवीचंद पवार (२३, रा. बुटातांडा, ता. सिंदखेडराजा) असे मृताचे नाव असल्याची माहिती उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. निवृत्त सहायक फौजदार सुभाष बारोटे यांच्या योगेशनगरातील घराच्या पहिल्या मजल्यावर आकाश देवीचंद पवार हा तरुण भाड्याने पत्नी व दीड वर्षाच्या मुलासह राहत होता. ८ ऑगस्ट रोजीच्या रात्री १० वाजेच्या सुमारास आकाश पवार हा बेल्टने पत्नीला मारहाण करीत असताना, आरडाओरडा ऐकून निवृत्त फौजदार सुभाष बारोटे आणि त्यांची पत्नी या दोघांनी तेथे जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आकाश पवार याची पत्नी प्रतीक्षा हीस बारोटे दांपत्याने खाली पाठवून दिले. दरम्यान, आकाश पवार हा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याचा आवाज आला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत प्रारंभी जालना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी औरंगाबाद येथे धूत हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथेही आकाश पवार याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. ९ ऑगस्टच्या रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत आकाश पवार याची पत्नी प्रतीक्षा पवार यांनी तालुका जालना ठाण्यात फिर्याद.

बातम्या आणखी आहेत...