आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाथरी रेल्वे गेटवर उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रेल्वे गेट जवळ बंद पडल्याने सुमारे एक तासभर या रस्त्यावरील वाहतूक रविवारी खोळंबल्याने एकच गोंधळ उडाला.
शहरातील पाथरी रेल्वे गेट जवळ उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पाथरीहून सेलू कडे येत असताना ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्यामुळे बंद पडले. उसाने भरलेले ट्रॅक्टर रेल्वे पटरी जवळ अडकून पडल्याने मोटार सायकल शिवाय इतर वाहने या रस्त्यावरून काढण्यास जमत नसल्याने या रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. १८ डिसेंबर रोजी ११ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने आणि याच रस्त्यावर रवळगाव ,माळसापुर, राधे धामणगाव, डासाळा आणि गुगळी धामणगाव येथे शहरातून जाणाऱ्या मतदाराचे वाहने अडकून पडली. एक तासानंतर ट्रॅक्टर रवाना झाल्यानंतर ११:३० वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.