आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण-उत्सव:नारळाचे तोरण बांधून आजुबाईच्या परंपरागत यात्रा उत्सवाला प्रारंभ, पारंपरिक पद्धतीने आन्वा येथील मंदिरात करण्यात आला यात्रेला प्रारंभ

आन्वा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्रसिद्ध असलेल्या आजुबाई यात्रेला ४ एप्रिल सोमवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. या वेळी यात्रेला परवानगी असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

चैत्र शुद्ध तृतीयापासुन रामनवमीपर्यंत हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो यातील मुख्य उत्सव हा स्वारी उत्सव आहे. हा उत्सव ९ एप्रिल रोजी शनिवारी रोजी चैत्र शुद्ध अष्टमीला साजरा करण्यात येणार आहे. तृतीया चैत्र शुद्ध तृतीया दिवशी गावातील आजुबाई मंदिरात भाविकांच्या असते मंडप उभारणी करण्यात आली. भाविकांकडून मंडपाला नवसाचे नारळाचे तोरण बांधणयात आले. त्यानंतर रात्री श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. चैत्र शुद्ध चतुर्थी ला सकाळी आजुबाई चा जन्म काळ वाचण्यात येणर आहे. पुढील पाच दिवस दररोज विविध प्रकारचे सोंग काढण्यात येतात. आन्वा येथील आजुबाई उत्सवात ४०० वर्षांची परंपरा आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी तुकाराम पंथांनी आपल्या कुटुंबाला संतती प्राप्त व्हावी याकरिता जगदंबा देवीची आराधना केली. तेव्हा देवीने त्यांना दर्शन देऊन पंथाच्या घरी अवतार घेण्याचा साक्षात्कार केला होता. त्यानुसार पंताच्या पत्नी चद्रकलाबाई यांच्या पोटी जन्म घेतला. मुलीचे नाव आजुबाई असे ठेवण्यात आले. तो दिवस आजुबाई जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अशी या उत्सवाची आख्यायिका आहे. मागील दोन वर्षां पासुन यात्रा बंद होती. परंतु, शासनाचे निर्बंध हटवल्याने यात्रा पुर्ण क्षमतेणे भरणार आहे. मंडप उभारणी नंतर पारंपरिक पद्धतीने मंडपाची पूजा प. पु. सोनू महाराज व दीपक महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच विठ्ठल मंदिरात होणारा नामजप सोहळा सुरू करण्यात आला आहे. तसेच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग पहायला मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...