आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसाराच्या रहाटगाडग्यात जीवन जगत असताना एक आदर्शवादी जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर निश्चितपणे आम्ही प्रभु श्रीरामचंद्र यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकावा, असे प्रतिपादन युवा रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज दौड यांनी केले. भोकरदन शहराजवळील सिद्धेश्वर नगर आलापुर येथे गुरुवर्य वै.बाळा बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव व संत तुकाराम बीज निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीराम कथा सोहळा सुरु आहे. संतोष महाराज आढावणे यांच्या मार्गदर्शनाने श्रीराम कथा प्रवक्ते ज्ञानेश्वर महाराज दौड जानेफळ यांच्या वाणीतुन रामकथा सांगितली जात आहे.
आम्ही जीवन शैली जगु शकलो तर आमच्याही जीवनात सदैव आनंद दरवळत राहील आणि आमचा संसार हा नंदनवनासारखा बहरून दुःखाचा लवलेश सुद्धा आमच्या जीवनात राहणार नाही. जीवनात व्यथा येतात पण त्या व्यथा कमी करण्यासाठीच राम कथा आहे म्हणून नित्य नेमाने श्री राम कथा श्रवण करावी, असे आवाहन दौड महाराजांनी केले. यावेळी सिद्धेश्वर महाराजांच्या जीवनावरील स्वलिखित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती. या सोहळयानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून भाविकांची गर्दी वाढत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.