आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून जालना सराफा बाजारात नवीन कर रचनेनुसार व्यवहार सुरू झाले. सोने-चांदीच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली असली तर सरचार्ज वाढवल्याने एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली. कपाशी आणि सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसे आलेच नाहीत. त्याचा परिणाम सराफा बाजारावर अगोदरच दिसून येत होता. त्यात दरवाढही झाल्याने दरवर्षी या काळात दिवसाला दोन ते अडीच किलोंची उलाढाल अवघी दोन-अडीचशे ग्रॅमवर आली आहे.
जालना सराफा बाजारातील ८० ते ८५ टक्के व्यवहार हे शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तर सराफा बाजारातही चांदी असते. मात्र या वर्षी सध्या लग्नसराई सुरू झाली असली तर सराफा बाजार किरकोळ व्यवहारावरच सुरू आहे. या वर्षी कपाशीला प्रतिक्विंटल किमान ११ हजार रुपये, तर साेयाबीनला ७ हजार रुपये दर मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र कपाशी ८ हजारांच्या वर गेली नाही, तर सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नसल्याने या वर्षी बाजारातही पैसा आलेला नाही. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क २.५ टक्क्यांनी कमी केले, तर दुसरीकडे सरचार्जही २.५ टक्क्यांनी वाढवला. मुळे दरात फारसा फरक पडणार नव्हता. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात सटोडियांमुळे सोने आणि चांदीचे दर हजार रुपयांनी वाढले. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,५०० व २२ कॅरेट सोने ५३,५०० तर चांदीचे दर ७०,००० रुपये होते, तर गुरुवारी बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याचे दर ५८,५०० व २२ कॅरेट सोने ५३,५०० तर चांदीचे दर ७१,००० रुपये प्रतिकिलो होते.
जालन्यातील दर ठरतात मुंबईतून जालना बाजारपेठेतील सोन्याचे दर मुंबईतून ठरतात. बुधवारी सायंकाळी ५ वाजता नवीन दर लागू करण्यात आल्यानंतर गुरुवारपासून खऱ्या अर्थाने व्यवहार सुरू झाले. आता हजार रुपयांनी दर वाढल्याने आणखी दर वाढले.
सोने आणखी चमकेल अर्थसंकल्पापेक्षा सटोडिया सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम करतात. सध्या झालेली दरवाढ त्यांच्यामुळेच आहे. हजार रुपये ही मोठी वाढ नसली तरी पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीची चिन्हे आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. - भरत गादिया, सराफ व्यावसायिक, जालना.
जालना सराफा बाजारातील ८० ते ८५ टक्के व्यवहार शेतकऱ्यांवर अवलंबून सध्या केवळ किरकोळ व्यवहार जालना शहरातील सराफा बाजारात सध्या चांदीच्या दागिन्यांमध्ये पैजण, जोडवे, करंडी, गिफ्ट आर्टिकल आदी वस्तूंची मागणी आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये डोरले, मणी, बांगड्या, पाटल्या, मिनी गंठण अशा वस्तूंना मागणी आहे. ग्राहक किरकोळ खरेदी करीत अाहेत. त्यामुळे बाजारात मंदी नसली तरी अपेक्षित उठाव आलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.