आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक मेजवानी:दोनदिवसीय ग्रंथोत्सवात परिसंवाद, कविसंमेलनासह भरगच्च कार्यक्रम

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ व २६ नोव्हेंबर २०२२ या दाेन दिवशी जालन्यातील टॉऊन हॉल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ग्रंथोत्सव-२०२२ होत आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, परिसंवाद, अनुभवकथन, जागर कवितेचा, प्रगट मुलाखत, कवि संमेलन, आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सोबतच कार्यक्रमस्थळी सदर दोन्ही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीही केली जाणार आहे.

ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी सकाळी १० . ३० वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली तर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, आमदार सतिश चव्हाण, आमदार ‍विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार‍ राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लहुजी कानडे मार्गदर्शन करणार आहेत. तर सूत्रसंचालन प्रा. प्रदीप देशमुख हे करतील. तत्पुर्वी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी गांधी चमन येथून विनीत साहनी, संगीता गोरंट्याल, मंगला धुपे, सुनिल हुसे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.

दुपारी १ वाजता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशासमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात देविदास फुलारी, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, मधुकर जोशी, डॉ. मधूकर गरड, प्रा.शशिकांत पाटील, प्रा. रंगनाथ खेडेकर सहभागी होणार आहेत. दुपारी २ वाजता ‘ग्रंथाने मला काय दिले’ हे या विषयावरील अनुभवकथन सुनिल हुसे, डॉ. राजशेखर बालेकर, अण्णासाहेब खंदारे, संतोष धारे, डी. बी. देशपांडे, शाम शेलगांवकर सांगणार आहेत.े त्यानंतर जागर कवितेचा’ या कार्यक्रमात सतीश लिंगडे, दिनेश सन्यांसी, सुमित शर्मा, अंजली काजळकर, प्रतिभा दहिवाळ, रेखा चव्हाण, ओंकार बिनीवाले सहभागी होणार आहेत. निवेदक म्हणून प्रा.रविंद्र मगर हे उपस्थित राहतील. शनिवारी सकाळी १० वाजता कालावधीत चित्रकार श्रीधर अंभोरे यांची प्रगट मुलाखत प्रा. डॉ. सतीश बडवे व रविंद्र सातपुते हे घेणार आहेत. सूत्रसंचालन विनोद जैतमहाल करणार आहेत.

तर दुपारी १२ वाजता भारतीय संविधान व आपण : काल, आज आणि उद्या या विषयावर विचार मंथन कार्यक्रमात प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, राजेश राऊत, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, एस. एन. कुलकर्णी, अरुण प्रधान हे सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन राजीव हजारे करणार आहेत. दुपारी चार वाजता अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. ग्रंथोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

या मान्यवरांचे होणार कविसंमेलन
बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात राज रणधीर, सुहास पोतदार, शिवाजी कायन्दे, राम गायकवाड, सत्यशिला तौर, प्रणिता लवटे, श्रीकांत गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, बाबू श्रीरामे, रेखा बैजल, ज्योती धर्माधिकारी, रमाकांत कुलकर्णी, कैलास भाले, सदाशिव कमळकर, डॉ.एकनाथ शिंदे, कविता नरवडे, सत्यभूषण अवस्थी, भिमराव सपकाळ, राजाराम जाधव, सुहास सदावर्ते, प्रभाकर शेळके, गणेश खरात, रेखा गतखने, जिजा वाघ, कैलास कोळेकर, मनोहर गाढवे, श्रीमंत ढवळे आणि कृष्णा कदम यांचा सहभाग राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...