आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:युडायस कार्यप्रणाली शाळेचा आरसा होय; केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांचे प्रतिपादन, रोहिलागड येथे कार्यशाळा

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी युडायस कार्यप्रणाली शाळेचा आरसा असल्याचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी सांगितले.

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील जिल्हा परिषद शाळेत युडायस केंद्रस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व शिक्षणाधिकारी यांनी ४ मे रोजी घेतलेल्या सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेच्या बैठकीतील सूचनेनुसार केंद्रस्तरीय युडायस २२-२३ केंद्रस्तरीय कार्यशाळा घेतली.

यावेळी केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व व माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य तंत्रस्नेही शिक्षक यांची उपस्थिती होती. केंद्रसमन्वयक विठ्ठल गीते यांनी युडायस प्रमुख बाबींचे सविस्तर विश्लेषण करून मार्गदर्शन केले. गंगावणे म्हणाले, कोरोना काळानंतर कोरोना काळातील उद्भवलेल्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता विकास पूरक विविध बाबींचे समावेश युडायसमध्ये नव्याने केल्याची व काळजीपूर्वक ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरावी. विद्यार्थी, शिक्षक, शाळा, समाज, कुटुंब, गाव वस्तीच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा भविष्यात राबवायच्या विविध विकास योजनांसाठी आधारभूत मूलभूत डाटाबेस साठी शाळेच्या विकासासाठी ज्या- त्या शाळेचा आरसा असतो त्या माहिती रूपी आरशात या मुख्याध्यापक यांनी भरलेल्या माहितीचे व शाळेचे प्रतिबिंब दिसते. म्हणून आपण योग्य अचूक तंतोतंत काळजीपूर्वक माहिती भरावी व विद्यार्थी गुणवत्ता व समाज शाळा विकास वाढीसाठी गांव विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

तत्पूर्वी शाळा पूर्व तयारी शाळा सिध्दी शाळा पीएफएमएस प्रणाली लोकसेवा अधिनियमाच्या काळजी वार्षिक कॅलेंडर मूलभूत साक्षरता मोफत गणवेश पाठ्यपुस्तके अमृतमहोत्सव सिड बाटल्स, वृक्ष वाटिका, ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन लाभांच्या योजना जलसंवर्धन स्पर्धा परीक्षा नवोदय शिष्यवृत्ती एनएमएमएस परिक्षा तासिका विषय पुर्व नियोजन मान्सून व शाळापुर्व आपती व्यवस्थापन तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य बोरसे, मुके, गांगे, मुख्याध्यापक कोकडे, गिरी, हूसे, घांगले, पठाडे, जामदार, टकले आदींची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...