आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी:जिल्ह्यात ‘वंचित’ने उघडले सोसायटीत पहिले खाते

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीने जालना जिल्ह्यात वंजार उमरद विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीत बिनविरोध खाते उघडले. "वंचित‘ चे विजय नामदेवराव लहाने हे बिनविरोध निवडून आले आहेत.

वंजार उमरद विविध विकास सोसायटीची निवडणूक सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांंनी जाहिर केली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता.मात्र वाघ्रुळ सर्कलमधील वंजार उम्रद व माळशेंद्रा गावातील सभासदांनी एकत्रीत येवून सदरील सोसायटी बिनविरोध करण्याचे ठरविले. त्यानुसार या सोसायटीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे व माळशेंद्रा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय नामदेवराव लहाने यांची बिनविरोध निवड झाली आली.

तर अन्य सोसायटीच्या बिनविरोध सदस्यामध्ये बाबासाहेब रंगनाथ सहारे, ब्रह्मा बाबुराव वाघ, बाळासाहेब साहेबराव जाधव , रामभाऊ मुक्ताजी वाघ , गुणाजी बापुराव पालवे,नाना रायभान वाघ, संतोष वामनराव वाघ,भानुदास राणोजी सहारे, दगडाबाई नारायण वाघ, कमल रावसाहेब वाघ, शिवाजी दामाजी लहाने, अर्जुन बाबुराव वाघ यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अवधुत यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...