आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जळगाव सपकाळ गावात गेल्या दोन महिन्यापासून रोहित्र अक्षरक्ष पुर्णपणे जळालेले असताना देखील महावितरण कार्यालयाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे जळगाव सपकाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने वेळोवेळी निवेदनामार्फत मागणी करून देखील राजकिय सुडबुद्दीने गावाला वेठीस धरण्याचे काम भोकरदन येथील महावितरण कार्यालयाने केल्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. भोकरदन येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारपासून शेकडो ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली.
दरम्यान, महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सहा तर दोन दिवसानंतर चार रोहित्र दुरुस्त करून देण्याचे तसेच एक्सप्रेस फिटर बसवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. प्रभारी उपअभियंता दारखंडे यांनी सरपंच व उपसरपंच तसेच गावकरी यांना लिंबू पाणी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते सुधाकर दानवे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक पाबळे यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडविले.
येणाऱ्या दहा दिवसांच्या आत पाच मागण्या पूर्ण न केल्यास गावातील महिला भोकरदन येथील महावितरण कार्यालयावर चप्पला मोर्चा काढणार असल्याचा इशारा सरपंच विशाखा साळवे यांनी दिला. उपविभागिय उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील जळगांव सपकाळ हे सर्वात मोठे पंधरा हजार लोकसंख्येचे तसेच बाजारपेठेच गाव असून सदरिल संपूर्ण गावामध्ये वीस वर्षापूर्वी सिंगल फेज योजनेअंतर्गत वीजपुरवठा करण्यात आला होता. परंतु सदरिल वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे.
वारंवार रोहित्रांमध्ये बिघाड होणे, गावांतर्गत खांबावरील संपूर्ण तार जीर्ण झालेल्या आहेत. पूर्ण पोलही जीर्ण होऊन तुटलेले आहेत. भोकरदन तालुक्यामध्ये बऱ्याच युनिटला एक्सप्रेस फिटर योजना मंजुर होऊन चालू झाली. परंतु आन्वा मुनिट मधील कोणत्याही गावामध्ये तसेच तालुक्यातील सर्वात मोठे गाव जळगांव सपकाळ येथे अद्यापपर्यंत एक्सप्रेस फिटर योजना झालेली नसल्याने सदरिल गावांतील विजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे, असे म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, प्रा. अंकुश जाधव, डॉ. शालीकराम सपकाळ, बि. एन. कड, महिला तालुकाध्यक्ष सुनिता सावंत, शहराध्यक्षा कमलताई जेठे, सोनाबाई कोल्हे, उपसरपंच रुख्मणबाई सपकाळ, सरपंच रमेश बरडे, अब्दुल कदिर बापु, शमीम मिर्झा, हबीब शेठ आदी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.