आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातपात:कुंभारी येथील महिलेचा अपघात नव्हे, तर घातपात

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी रात्रीच्या वेळी भोकरदन शिवारातील कुंभारी येथे बहीण, भाऊजी यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भाऊ सुनील साखळे याने नातेवाइकांबरेाबर घटनास्थळ गाठले. येथे बहिणीचा ट्रॅक्टरच्या चाकामध्ये मृतदेह आढळला. तर या ठिकाणी इतरत्र बहिणीचा एकही नातेवाईक नसल्याने हा घातपात असल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने भोकरदन पोलिसांत दिली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल पदावर असलेल्या कविता आढाव (२६) या पती गजानन आढाव यांच्यासह हसनाबाद येथे राहत होत्या. ३१ डिसेंबर रोजी दोघांचा अपघात झाल्याची माहिती भाऊ सुनील साखळे यांना मिळाली. यानुसार त्यांनी घटनास्थळ गाठले असता हा घातपात असल्याचा त्यांना संशय झाला. हा प्रकार बहिणीच्या सासरच्या मंडळींनी केला असल्याची फिर्याद भोकरदन पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी मृत महिला कविता आढावचे भाऊ सुनील साखरे यांनी तक्रार दिल्यानंतर पती गजानन रघुनाथ आढाव (रा. पालपाथ्री तालुका, फुलंब्री), सासू कौशल्या रघुनाथ आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, ताराबाई बाळा, मीरा जनार्दन चव्हाण, शीला गजानन कोंडके, घटनास्थळावरून फरार झालेला ट्रॅक्टरचा चालक, यांच्याविरोधात तक्रार दिल्याने भोकरदन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...