आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना काल रविवार (१८ डिसेंबर) रोजी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, दिंद्रुड पोलिसांत पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. या खळबळजनक घटनेने दिंद्रुड परिसर हादरला आहे.
माजलगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे जालन्याच्या मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड परिसरात सालगडी म्हणून काम करते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आई-वडील शेतात कामाला गेले असताना बाळू ऊर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला एका उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला. एका महिलेनेही ही घटना घडत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. पीडित मुलगी ही सतरा वर्षांची अल्पवयीन आहे. शुक्रवारी झालेल्या घटनेमुळे दिंद्रुड व परिसर हादरला असू भीतीपोटी दोन दिवसांनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान दिंद्रुड पोलिस ठाण्यास पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी भेट देत आरोपी विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना तत्काळ जेरबंद केले. कारवाई दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या सपोनि प्रभा पुंडगे, युवराज श्रीडोळे, विशाल मुजमुले, मुकेश शेळके, रेवण दुधाने आदींनी केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
एसपी, एएसपींची भेट
ही घटना समाेर आल्यानंतर सोमवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाई विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिंद्रुडमध्ये भेट देत घटनेची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. बच्चू यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.