आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले कार्य उल्लेखनीय; पालकमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळामध्ये भयभीत झालेल्या, घाबरलेल्या जनतेला शासन-प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना तसेच कोरोनावर विजय मिळवलेल्यांची माहिती यशकथांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना जगण्याची प्रेरणा, जिद्द माध्यमांनी दिली. कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

जालना येथील बीज शीतल सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, एसपी विनायक देशमुख, एसीईओ कल्पना क्षीरसागर, कल्याण सपाटे, सिव्हिल सर्जन डॉ. अर्चना भोसले, डीएचओ डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री टोपे म्हणाले, आरोग्य, शिक्षण, विद्युतीकरण, रस्ते विकास, ग्रामीण भागाचा विकास यासह सर्वच विकासकामांमध्ये जालना जिल्हा अग्रेसर राहावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक गतीने होऊन सर्वसामान्यांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आपण आदर्श पत्रकारितेच्या पाठीशी सदैव उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, कोरोनाकाळात विश्वासार्ह व खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमांनी केले. पत्रकारांनी केलेल्या या कामामुळे जनसामान्यांमधील भीतीचे वातावरण निवळण्यास मदत झाली. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये असलेले समज, गैरसमज दूर करण्यामध्ये माध्यमांची मदत झाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...